Man dies due to lack of access to healthcare
आमच्या संस्थेच्या माध्यमातून गेल्या तीन-चार वर्षांपासून नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून अनेक बेवारस रुग्ण रात्री-अपरात्री दिवस-रात्र रस्त्यावर झोपणाऱ्या अनेक बेवारस लोकांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना ऍडमिट करून त्यांना ठीक झाल्यानंतर झाल्यानंतर त्यांना घरापर्यंत पोहोचवण्यात आलेले आहे|
परंतु एका गोष्टीची कमतरता वाटते की आपले प्रशासन अशा लोकांसाठी काहीही करत नाही, जेव्हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पाण्यामध्ये एखादे माणूस अडकतो त्याला वाचवण्यासाठी प्रशासन मिलेटरी, हेलिकॉप्टर, घेऊन त्या माणसाचा जीव वाचवला जातो परंतु अशा बेवारस लोकांना वाचवण्यासाठी प्रशासन कोणतेही पाऊल उचलत नाही याची खंत वाटते, माणसा-माणसातले भेदभाव प्रशासन करत आहे याचे उदाहरण दिलेल्या फोटोमध्ये दिसत आहे ह्या माणसाला योग्यवेळी उपचार भेटला असता तर तो जगू शकला असता त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले असे मुंबईसारख्या ठिकाणी राहणाऱ्या फुटपाथवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे अशा गोष्टीकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालावे?
मधुकर शिंदे
आधार फाउंडेशन,
संस्थापक अध्यक्ष